04 October, 2023

 

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानाचे 5 ऑक्टोबर रोजी आयोजन

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानाचे अध्यक्ष

ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते होणार कार्यक्रमाचे उद्घाटन

 

 

 हिंगोली (जिमाका), दि. 04 : जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण विभागातर्फे दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचे गुरुवार, दि. 5 ऑक्टोबर, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता येथील मधुरदीप पॅलेस, अकोला बायपास, गारमाळ येथे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे अल्पसंख्यांक विकास, औकाफ, पणन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे राहणार आहेत. तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे उपस्थित राहणार आहेत.

यावेळी विशेष निमंत्रित म्हणून खासदार हेमंत पाटील, आमदार सर्वश्री. सतीष चव्हाण, विक्रम काळे, विप्लव बजोरिया, श्रीमती प्रज्ञाताई सातव, तान्हाजीराव मुटकुळे, संतोष बांगर, चंद्रकांत उर्फ राजूभैय्या नवघरे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव अभय महाजन, समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, दिव्यांग कल्याण आयुक्त विष्णुदास घोडके, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास जास्तीत जास्त दिव्यांग बांधव व नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त राजू एडके यांनी केले आहे. 

*****


No comments: