08 November, 2023

 

जागेवरच निवड संधी मोहिमेतून 06 सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांची निवड

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 08 :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर (एनसीएस) हिंगोली येथे आज दि. 08 नोव्हेंबर, 2023 रोजी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जागेवरच निवड संधी मोहिमेअंतर्गत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या रोजगार मेळाव्यात क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लि. हिंगोली, भारत फायनान्स हिंगोली, मनसा मोटर्स, हिंगोली या आस्थापना/कंपनीचे उद्योजक उपस्थित होते. जागेवरच निवड संधी या विशेष मोहिमेअंतर्गत रोजगार मेळाव्यासाठी जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा व पदवी तसेच पदवीधारक पात्रतेचे 28 उमेदवार उपस्थित होते. या 28 उमेदवारांपैकी 06 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी मेळाव्यास उपस्थित सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना करिअर कसे निवडावे याबाबत सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी म. ना. राऊत, म. शां. लोखंडे, रा. द. कदम, ना. ज. निरदुडे, र. ला. जाधव, आ. ल. शेख, बा. अ. शिंदे यांनी परिश्रम घेतले.

****   

No comments: