08 November, 2023

 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत

दिवाळी महोत्सव स्टॉलचे उदघाटन

 


  हिंगोली (जिमाका), दि. 08 : जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हिंगोली अंतर्गत सन 2018 पासून इंटेनसिव पद्धतीने अभियानाची अंमलबजावणी चालू आहे. या अभियानांतर्गत स्वयंसहायता गटाची बांधणी करुन त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने निधी उपलब्ध करुन त्यांच्या शाश्वत उपजीविका वाढविण्याच्या अनुषंगाने  नियमित प्रयत्न केले जातात.   

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 08 नोव्हेंबर, 2023 रोजी दिवाळी महोत्सवानिमित्त स्वयंसहायता समूहाने उत्पादित केलेल्या उत्पादनांचे व दिवाळी फराळाच्या स्टॉलचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी  माडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन  अनंत कुंभार , उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण गणेश वाघ, जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सारस्वत  यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रदर्शनामध्ये दिवाळीनिमित्त फराळाचे पदार्थ, हस्तकलेच्या वस्तू, अगरबत्ती यासारख्या वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने घेऊन महिलांनी जिल्हा परिषद हिंगोली या ठिकाणी गटाचे स्टॉल लावण्यात आले आहे . या स्टॉलसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रकल्प संचालक यांनी सर्व जिल्हा परिषद कर्मचारी व भेटीसाठी येणारे सर्व नागरिक यांनी या स्टॉलला भेटी देऊन प्रत्येकांनी खरेदी करण्याबाबत  व गटांची आर्थिक उन्नती वाढविण्याच्या अनुषंगाने हातभार लावावा असे आवाहन केले आहे.

यासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सारस्वत, जिल्हा व्यवस्थापक राम मेकाले, जिल्हा व्यवस्थापक राजू दांडगे, जिल्हा व्यवस्थापक ओमप्रकाश गलांडे, जिल्हा व्यवस्थापक मिलिंद कुकडे, तालुका व्यवस्थापक सिद्धार्थ पंडित, तानाजी काळे, उज्वला गायकवाड, रमेश पवार, विष्णू खाडे, संतोष भोसकर, अनंत मुळे, प्रभाग समन्वयक दिनकर तपासे, गजानन लोखंडे यांनी उपस्थित राहून परिश्रम घेतले.

******

No comments: