07 November, 2023

 

स्मार्ट प्रकल्पांतर्गत तीन दिवशीय अभ्यास दौऱ्यासाठी जाणाऱ्या वाहनास

हिरवी झेंडी दाखवून रवाना

                                                                       


                                      

  हिंगोली (जिमाका), दि. 07 : मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प मुल्यसाखळी विकास शाळा (VCDS 2023-24) अंतर्गत आयोजन प्रमुख, अंमलबजावणी कक्ष (स्मार्ट) तथा प्रकल्प संचालक आत्मा, हिंगोली यांच्यामार्फत दि. 07 नोव्हेंबर ते 09  नोव्हेंबर, 2023 या कालावधीत 3 दिवशीय प्रशिक्षणासह राज्याअंतर्गत अभ्यास दौऱ्याचे करण्यात आले आहे. या प्रशिक्षण व अभ्यास दौऱ्यावर जाणाऱ्या वाहनास हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आली .

यावेळी प्रकल्प संचालक आत्माचे प्रमुख जिल्हा अंमलबजावणी कक्ष तथा प्रकल्प संचालक बी. आर. वाघ, स्मार्टचे जिल्हा अंमलबजावणी कक्षाचे नोडल अधिकारी जी. बी. बंटेवाड, पुरवठा व मूल्य साखळी तज्ञ जी. एच. कच्छवे, अर्थशास्त्र तज्ञ तथा वित्तीय सल्लागार जितेश नालट, एमआयएस एक्सपर्ट बालाजी मोडे, लेखापाल शेख मोहिब उर रहेमान, अजय चक्के, समुदाय आधारित संस्थाचे सर्व सदस्य, सभासद उपस्थित होते.

हे प्रशिक्षण सहल दि. 08 नोव्हेंबर, 2023 रोजी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे मार्गदर्शन/प्रशिक्षण घेणार आहे. दि. 09 नोव्हेंबर, 2023 रोजी हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज जि. सांगली या ठिकाणी मार्गदर्शन व प्रशिक्षण व प्रक्षेत्र भेट देणार आहे.

*******

 

No comments: