20 November, 2023

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांची

माहिती देण्यासाठी 24 नोव्हेंबर रोजी मेळाव्याचे आयोजन

 

  

हिंगोली, (जिमाका) दि. 20  :  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील समाज बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात.

महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत व शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी योजनांचा प्रचार, प्रसार व जास्तीत जास्त लोकांना योजना लाभ मिळावा यासाठी हिंगोली जिल्ह्यातील मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील समाज बांधवासाठी महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी दि. 24 नोव्हेंबर, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह, ग्यानमाता शाळेसमोर, नांदेड येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे.

या मेळाव्यासाठी सर्व समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठी विकास महामंडळ (मर्यां.), हिंगोली यांनी केले आहे.   

*******

No comments: