06 March, 2025
जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी महिला मेळाव्याचे आयोजन
• 8 ते 10 मार्च या कालावधीत बचतगटाचे विक्री, प्रदर्शन
हिंगोली (जिमाका), दि. 06 : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त येथील महावीर भवन येथे शनिवार, दि. 8 मार्च, 2025 रोजी महिला मेळावा व नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत बचत गटाद्वारे उत्पादित वस्तुचे जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन दि. 8 मार्च रोजी दुपारी 12 वाजता आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उगम संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव राहणार आहेत. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाचे विभागीय संसाधन अधिकारी केशव पवार, विभागीय सल्लागार पवन देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी जी. जी. चितळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजाभाऊ मगर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम, आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापक अनिल इंगोले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.
बचत गटाद्वारे उत्पादित वस्तुचे जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन महावीर भवन, वाशिम रोड, रामलीला मैदानाजवळ, हिंगोली येथे दि. 8 ते 10 मार्च, 2025 या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.
या उद्घाटन कार्यक्रमास व बचत गटाच्या विक्री प्रदर्शनास भेट देऊन याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी विलास जगताप यांनी केलेआहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment