04 March, 2025
अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन
• निवडीसाठी गुरुवारी होणार मुलाखती
हिंगोली (जिमाका), दि. 04 : उद्योग संचालनालय महाराष्ट्र शासन मुंबई पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र हिंगोली आयोजित, महाराष्ट्र उद्योजक व्यापार व गुंतवणूक सुलभता कक्ष (मैत्री) व जिल्हा उद्योग केंद्राच्या सहकार्याने अनूसचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यासाठी दि. 10 मार्च ते 27 मार्च, 2025 या कालावधीत छत्रपती संभाजीनगर येथे 18 दिवशीय निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या मुलाखती दिनांक 6 मार्च, 2025 रोजी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, व्दारा जिल्हा उद्योग केंद्र,जिल्हाधिकारी कार्यालय इमारत, हिंगोली या ठिकाणी होणार आहेत. या कार्यक्रमात हिंगोली जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या उद्योग संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मध्ये अन्न प्रक्रिया उद्योग, दाल मिल, ऑईल मिल, हळद पावडर, मिरची पावडर, मसाले उद्योग, पापड उद्योग, बेकरी उत्पादन, शेवया उद्योग, वेफर्स, गारमेंट, केस व त्वचा निगा इत्यादी उद्योगाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
यासोबतच उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, विविध व्यवसाय संधी, संवाद कौशल्य, शासकीय, निमशासकीय व इतर महामंडळाच्या कर्ज व अनुदान योजना, बँकेची भूमिका, प्रकल्प अहवाल, मार्केटींग, व्यवसाय व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात प्रत्यक्ष मुलाखती घेऊन पात्र लाभार्थीची निवड करण्यात येईल. हे प्रशिक्षण नियमितपणे उपस्थित राहून पूर्ण केल्यानंतर शासन नियमाप्रमाणे प्रमाणपत्र देण्यात येईल.
प्रवेशासाठी व अधिक माहितीकरिता सिद्धार्थ थोरात, (मो.9552183038), एमसीईडी, हिंगोली यांना दिनांक 6 मार्च, 2025 पर्यंत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, व्दारा जिल्हा उद्योग केंद्र, एस -12 प्रशासकीय इमारत, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र व प्रकल्प अधिकारी (मो.9765291785), महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली यांनी केले आहे.
********
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment