04 March, 2025

निरुपयोगी वाहनाची होणार लिलावाद्वारे विक्री

हिंगोली (जिमाका), दि. 08 : हिंगोली जिल्ह्यातील वाहनमालकांकडून विविध कर थकीत असल्यामुळे त्यांनी तात्काळ करभरणा करून आपली वाहने ताब्यात घ्यावीत अन्यथा त्यांची लिलावाद्वारे विक्री करण्यात येईल व त्यानंतर सदर वाहनावर आपला कोणताही दावा राहणार नाही, असे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कळविले होते. अशा वाहनांना कार्यालयाकडून यापूर्वीच नोटीस बजावण्यात आल्या असूनही संबंधित वाहनधारकांनी याची कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत अटकाविण्यात आलेली व वाहन धारकामार्फत सोडविण्यात न आलेली तसेच निरुपयोगी वाहनांची ई-लिलाव पध्दतीने विक्री करण्यात येणार आहे, असे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल गावडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. या ई-लिलावामध्ये इच्छूक बोलीदारांना सहभागासाठी सूचना प्रसिध्द करण्यात येत आहेत. निरुपयोगी वाहन धारकामार्फत सोडविण्यात न आलेली तसेच निरुपयोगी वाहनांची ई-लिलाव पध्दतीने https://www.eauction.gov.in या संकेतस्थळावर विक्रीसाठी उपलब्ध आहे. ई-लिलाव ऑनलाईन, ऑफलाईन कागदपत्रे नोंदणी दि. 6 मार्च, 2025 रोजी सकाळी 11 ते दि. 12 मार्च, 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत करता येणार आहे. कागदपत्रे पडताळणी व मंजुरी दि. 13 मार्च, 2025 रोजी सकाळी 11 ते दि. 19 मार्च, 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. बोलीदारांना दि. 20 मार्च, 2025 रोजी सकाळी 11 ते दि. 26 मार्च, 2025 या कालावधीत वाहने पाहता येणार आहेत आणि दि. 28 मार्च, 2025 रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत ऑनलाईन ई-लिलाव होणार आहे. लिलावाच्या अटी व शर्ती तसेच वाहनांची यादी वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. लिलावाद्वारे विक्री होणाऱ्या वाहनांची पुनर्नोंदणी होणार नाही. ई-लिलावाद्वारे विक्री करण्यात येणाऱ्या वाहनांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. हिंगोली बस डेपोमध्ये असलेली वाहने एमएच 07 सी 9779 स्लीपर बस, एमटीडी 3756 ट्रक, एमएच 38 ए 0184 एम/सी, एमएच 37 जे 0610 एलजीव्ही, एमएच 38 एफ 0315 ए/आर, तर नरसी नामदेव पोलिस स्टेशन येथील एमएच 38 के 3936 एम/सी, कळमनुरी एसटी डेपो येथील एमच 26 एचजीव्ही, एमच 14 एफ 9291 एलजीव्ही, आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन येथील एमएच 26 टी 5248 ए/आर, एमएच 26 ई 2759 ए/आर, एमएच 40 एन 2597 एमजीव्ही, एमएच 14 एफसी 0169 टी/टॅक्सी, एमएच 299522 ऑनलाईन रेकॉर्ड केए 22ए 1789 क्रमांकाचे टिप्पर अशी वाहने आहेत. तसेच वसमत एसटी डेपो येथील एमएच 30 ई 5095 एचजीव्ही, एमएच 22 एन 2372 एलजीव्ही, एमएच 26 जी 6242 ए/आर, एमएच 37 बी 0323 एलजीव्ही आणि एमएच 26 बी 7684 एलजीव्ही, एमएच 20 एटी 5606 एलजीव्ही या क्रमांकाच्या वाहनांचा यात समावेश आहे. वसमत ग्रामीण पोलीस स्टेशन येथील एमएच 28 बी 6600 एचजीव्ही, एमएच 26 जी 4840 ए/आर, एमएच 26 जी 5009 ए/आर, एमएच 38 एफ 0643 ए/आर, एमएच 26 एल 0751 महिंद्रा मॅक्स, एमएच 26 एडी 5019 एलजीव्ही, एमएच 23 7755आणि एमएच 38 एफ 0608 ए/आर आणि कुरुंदा पोलीस स्टेशन येथील एमएच 232272 एचजीव्ही या क्रमांकाच्या वाहनांचा यात समावेश आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. *****

No comments: