01 March, 2025
जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी घेतला अल्पसंख्याक विकास योजनांचा आढावा
*एनटीसी येथील महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन*
हिंगोली, दि. ०१ (जिमाका) : जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी शासकीय विश्रामगृह येथे आज झालेल्या बैठकीत अल्पसंख्याक समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेतला. तसेच या योजनांचा लाभ अल्पसंख्याक समाजातील प्रत्येक पात्र व्यक्तीला देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या.
अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा नियोजन अधिकारी जी. जी. चितळे, जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सदानंद सरकटे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.
राज्य शासनामार्फत अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ समाजातील अल्पसंख्याक घटकांपर्यंत पोहचवून त्यांच्या विकासाला गती देण्यासाठी प्रयत्न करावा, असे श्री. गांधी यावेळी म्हणाले.
अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासन शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य करते. त्याचबरोबर अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह हिंगोली येथे कार्यान्वित आहे. या वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी जास्तीत जास्त मुलींना प्रोत्साहित करावे, असे श्री. गांधी यांनी सांगितले.
*एनटीसी येथील जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय*
जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे हिंगोली, एनटीसी भागातील जिल्हा कार्यालयाचे श्री. गांधी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ आणि जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सदानंद सरकटे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment