06 November, 2025
प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख नियुक्तीसाठी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये ऑनलाईन परीक्षा • आवेदनपत्र भरण्यासाठी 1 जानेवारीपर्यंत मुदतवाढ
हिंगोली (जिमाका), दि. 06 : राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2025चे ऑनलाईन पद्धतीने दि. 1 ते 5 डिसेंबर, 2025 या कालावधीत आयोजन करण्यात येणार होती. काही तांत्रिक व प्रशासकीय कारणास्तव या परीक्षेचे आयोजन जानेवारी/फेब्रुवारी-2026 मध्ये घेण्याचे नियोजन आहे. सुधारित परीक्षेच्या तारखा तथावकाश परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.
या परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदत दि. 10 नोव्हेंबर, 2025 पर्यंत देण्यात आली होती. ही मुदत वाढवून आता दि. 1 जानेवारी, 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांचा अनुभव, शैक्षणिक पात्रता ही दि. 1 जानेवारी, 2026 रोजीची अंतिम समजण्यात येईल. त्यानुसार सर्व पात्र उमेदवारांनी, परीक्षार्थींनी विहित मुदतीत आवेदनपत्र भरण्याची कार्यवाही करावी, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
***
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment