11 November, 2025
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आरोग्य सेवांचा आढावा
• आरोग्य संस्था एनकॉस प्रमाणित कराव्यात
हिंगोली (जिमाका), दि. 11 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यांची आढावा बैठक घेतली.
राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन कार्यक्रम अंतर्गत निर्धारित केलेल्या निर्देशांकाची पूर्तता करून आरोग्य संस्था एनकॉस प्रमाणित कराव्यात. ज्या आरोग्य संस्थेचे काम कमी आहे तेथील कर्मचारी स्टाफ एनकॉस आरोग्य संस्थेच्या ठिकाणी देण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी दिल्या.
सर्व राष्ट्रीय कार्यक्रमाचा व आरोग्य सेवेचा आढावा घेतला. यात प्रामुख्याने राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत निक्षय पोर्टलवर नाव नोंदणी वाढविण्याबाबत सूचना देण्यात आल्या. शहरी भागातील नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र यांच्या ओपीडी वेळेमध्ये बदल करून दुपारी 2 ते रात्री 10 ऐवजी सकाळी 8: 30 ते सायंकाळी 5: 30 असा बदल करण्याचा ठराव घेण्यात आला.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितिन तडस, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडूरंग फोपसे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस शैलजा कुप्पास्वामी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिन राठोड, डॉ. गंगाधर काळे, डॉ अरुणा दहिफळे, डॉ तृप्ती पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गजानन चव्हाण, डॉ. गणेश जोगदंड, डॉ. संदीप काळे , डॉ. डी व्ही. सावंत, डॉ. प्रशांत पुठावर, डॉ. निशांत थोरात अमोल कुलकर्णी आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment