07 November, 2025

‘वंदे मातरम’ गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त निनादला भारतभूमीच्या गौरवाचा सूर हजारो विद्यार्थ्यांनी एकाचवेळी केले 'वंदे मातरम' गिताचे समूह गायन

हिंगोली (जिमाका), दि. 07 : "वंदे मातरम्" या गीतास आज 150 वर्षे पूर्ण होत आहेत. ही बाब सर्व देशवासीयांसाठी अभिमानास्पद आहे. त्याअनुषंगाने आज येथील जिल्हा परिषद कन्या प्रशाला मैदानावर हजारो विद्यार्थी, तरुणांच्या उपस्थितीत 'वंदे मातरम' गायनाचा सामूहिक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वंदे मातरम् पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी कृष्णा देशमुख यांनी वंदे मातरम् गितासंदर्भात सखोल माहिती दिली. वंदे मातरम् गिताने भारतीयांना एकत्र आणण्यात आणि देशभक्तीची भावना जागृत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी हे गीत लिहिले असून, 1896 साली रवींद्रनाथ टागोर यांनी प्रथमच ते गायले होते. वंदे मातरम् ने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अत्यंत प्रेरणादायी भूमिका निभावली. वंदे मातरम् हे भारतमातेच्या ममतेचे प्रतीक आहे आणि ते ऐकताना प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत होते. राज्यातील शासकीय तालुका व जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये "वंदे मातरम्" गीताच्या 150 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेशसिंग चव्हाण, शिक्षण अधिकारी (योजना) संदीप सोनटक्के, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी विशाल रांगणे, प्राचार्य आर.व्ही.बोथीकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मैदानावर अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ***

No comments: