23 January, 2019

जवाहर नवोदय विद्यालयाची निवड चाचणी परीक्षा 2 फेब्रुवारी रोजी


जवाहर नवोदय विद्यालयाची निवड चाचणी परीक्षा 2 फेब्रुवारी रोजी

हिंगोली, दि.23: जवाहर नवोदय विद्यालय येथील इयत्ता 9 वी ची निवड चाचणी परीक्षा ही दिनांक 2 फेब्रुवारी, 2019 रोजी सकाळी 10.00 वाजता जवाहर नवोदय विद्यालय, वसमतनगर, हिंगोली येथे घेण्यात येणार आहे. या परीक्षेत एकूण 243 विद्यार्थी बसलेले आहेत.
ज्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन हॉल टिकीट निघाले नाहीत, त्यांनी दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत किंवा त्या अगोदर घेण्यासाठी यावे, असे आवाहन प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, वसमतनगर यांनी केले आहे.
****



No comments: