23 January, 2019

जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाष चंद्र बोस यांना अभिवादन








जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाष चंद्र बोस यांना अभिवादन

        हिंगोली,दि.23: नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती निमित्त आज त्यांच्या प्रतिमेस अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
            येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात उपजिल्हाधिकारी (रोहयो) तथा निवासी उपजिल्हाधिकारी  खुदाबक्ष तडवी,  जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, सांख्यिकी अधिकारी                श्री. पारवेकर, नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी  नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
*******

No comments: