18 January, 2019

महाडिबीटीवरील शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे आवाहन



महाडिबीटीवरील शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज
तात्काळ निकाली काढण्याचे आवाहन

हिंगोली, दि.18: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व विजाभज,इमाव व विमाप्र कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती/विजाभज/इमाव व विमाप्र प्रवर्गातील पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती  / शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क व इतर शैक्षणिक  योजनेचा लाभ देण्यात येतो.  सदरील योजना ही सन 2017-18 पासून माहिती व तंत्रज्ञान विभागाने विकसित केलेल्या महाडिबीटी  या पोर्टलद्वारे राबविण्यात येत आहे. महाडिबीटी या पोर्टलद्वारे उक्त प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे पात्र आवेदनपत्रे मंजुरीस्तव या कार्यालयाकडे सादर करण्याबाबत सर्व मागासवर्गीय विद्यार्थी, पालक व महाविद्यालये यांना वारंवार बैठकीद्वारे व जाहिर आवाहन करुन सूचित करण्यात आलेले आहे. तथापी अद्यापही  शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी भरलेले आवेदनपत्रे मंजुरीसाठी कार्यालयाकडे पाठविण्यात सदर अर्जासोबत प्रमाणपत्राच्या मुळ प्रती  ऐवजी  छायांकित प्रती जोडण्यात आल्याचे दिसुन येते. तसेच भारत सरकार शिष्यवृत्ती  करिता लागणारी सर्व मुळ प्रमाणपत्रे स्कॅन करुनच अर्जासोबत सादर करण्यासाठी  सर्व प्राचार्यांना कळविण्यात आलेले आहे. 
              तसेच या कार्यालयस्तरावर ऑनलाईन अर्जांची  पडताळणी केली असता, आवश्यक सर्व कागदपत्रे जोडली नसल्याचे आढळून येत आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अर्जासोबत मुळ कागदपत्रे स्कॅन झाल्याची खात्री  करुन केवळ परिपुर्ण अर्ज ऑनलाईन महाडीबीटी या पोर्टलवर मंजुरीकरिता पाठवावे. त्रुटीमुळे परत करण्यात आलेल्या अर्जांतील त्रुटीची पुर्तता झाल्याची खात्री करुनच अर्ज ऑनलाईन संकेतस्थळावर सादर करावेत. या कार्यालयाकडून त्रुटींपुर्तता करणेसाठी परत करण्यात आलेले अर्जांतील त्रुंटींची पुर्तता न करता पुन्हा अर्ज सादर केल्यास अर्ज रद्द करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी  संबंधिताची असेल.
         तसेच शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी भरलेले आवेदनपत्रे मोठया प्रमाणावर अद्यापही विद्यार्थ्यांच्याच लॉगीन वर प्रलंबित दिसून येत आहेत. तरी सर्व विद्यार्थी व पालकांना आवाहन करण्यात येते की, विद्यार्थ्यांच्या लॉगीनवरील शिष्यवृत्तींचे परिपूर्ण अर्ज तात्काळ महाविद्यालयाचे लॉगीन वर सादर करावेत व महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले महाडिबीटीचे पोर्टलवरील आवेदपत्रे तपासूनच  ऑनलाईन महाडी. बी. टी. च्या पोर्टलवर मंजुरीकरिता पाठवावे.
तरी हिंगोली जिल्हयातील सर्व पात्र मागासवर्गीय विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच महाविद्यालय यांनी आपल्यास्तरावर प्रलंबित असलेले शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज तात्काळ ऑनलाईन महाडी.बी.टी. च्या पोर्टलवर पुढे पाठविण्याची कार्यवाही करावी. यामध्ये पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसाठीचे आवेदनपत्रे विद्यार्थी किंवा महाविद्यालयांच्या लॉगीन वर प्रलंबित राहिल्यामुळे पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जबाबदार राहणार नाही, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
0000000

No comments: