11 January, 2019

पालकमंत्री दिलीप कांबळे यांचा जिल्हा दौरा


पालकमंत्री दिलीप कांबळे यांचा जिल्हा दौरा
        हिंगोली, दि.11: सामाजिक न्याय आणि  विशेष सहाय, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे हे हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
 रविवार दिनांक 13 जानेवारी, 2019 रोजी सकाळी 9.45 वाजता हिंगोली येथे आगमन, सकाळी 11.00 वाजता जिल्हा कोषागार कार्यालय, हिंगोली येथील नुतन इमारतीच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती (स्थळ :जिल्हा कोषागार कार्यालय, नुतन इमारत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे, हिंगोली), दुपारी 12.15 वाजता हिंगोली नगर परिषदेच्या विशेष वैशिष्ट्यपूर्ण अंतर्गत विविध विकास कामांचा पायाभरणी समारंभ (स्थळ : महात्मा गांधी चौक, हिंगोली), दुपारी 4.00 वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली), सायंकाळी 6.00 वाजता हिंगोली येथून वाहनाने जिंतूर-जालना मार्गे औरंगाबादकडे प्रयाण करतील.
****


No comments: