12 January, 2022

 

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 22 रुग्ण ; तर 11 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

·  74 रुग्णांवर उपचार सुरु

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 12 : जिल्ह्यात 22 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 03 व्यक्ती, वसमत परिसर 04 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 05 व्यक्ती, वसमत परिसर 04 व्यक्ती, औंढा परिसर 01 व्यक्ती व सेनगाव परिसर 05 व्यक्ती असे एकूण 22 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 11 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 16 हजार 167 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 697 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 74  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 396 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****

No comments: