21 January, 2022

 

मिशन वात्सल्य अभियानांतर्गत कोव्हिड - 19 मुळे मृत्यु झालेल्या व्यक्तींच्या

 पाल्यांनी कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन

            हिंगोली, (जिमाका) दि.21 :  जिल्हयामध्ये कोव्हिड - 19 मुळे मृत्यु झालेल्या व्यक्तींच्या पाल्यांना मिशन वात्सल्य अभियानाअंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन 2021-2022 या जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्याकडून उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

            इच्छुक लाभार्थ्यांनी हँड एम्ब्रॉयडर (HAND EMBROIDERER), एडिटर (EDITOR), रिटेल सेल्स असोशिएट (Retail Sales Associate), रिटेल टीम लिडर (RETAIL TEAM LEADER), फ्रुटस ॲन्ड व्हेजीटेबल ड्रायिंग (FRUITS AND VEGETABLES DRYING) / डिहायड्रेशन टेक्नीशियन (DEHYDRATION TECHNI), जाम, जेली ॲन्ड केचअप प्रोसेसिंग टेक्नीशियन (Jam, Jelly and Ketchup Processing Technician),  पिकल मेकींग टेक्नीशियन (Pickle Making Technician), इलेक्ट्रीशियन डोमेस्टीक सोल्यूशन (Electrician Domestic Solutions), लाईनमन डिस्ट्रीब्यूशन (Lineman Distribution), इंडस्ट्रीयल इलेक्ट्रीशियन (Industrial Electrician), फिटर-मेकानिकल ॲसेम्बली (FITTER - MECHANICAL ASSEMBLY), आयटी ओऑरडीनेटर इन स्कूल (IT COORDINATOR IN SCHOOL), सोलार पॅनल इन्स्टॉलेशन टेक्नीशियन (SOLAR PANEL INSTALLATION TECHNICIAN), असिस्टंट सर्वेअर (ASSISTANT SURVEYOR), डोमेस्टीक डाटा एंट्री ऑपरेटर (DOMESTIC DATA ENTRY OPERATOR), सीआरएम डोमेस्टीक नॉन व्हाईस (CRM DOMESTIC NON –VOICE), इनव्हेंटरी क्लार्क (INVENTORY CLERK), कुरिअर डिलिव्हरी एक्झ्यूकेटीव्ह (COURIER DELIVERY EXECUTIVE) या कोर्समध्ये प्रशिक्षण घेण्याची सुवर्ण संधी आहे.

            जिल्हयातील कोव्हिड - 19 मुळे मृत्यु झालेल्या व्यक्तींच्या  इच्छुक पाल्यांनी तात्काळ जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली या कार्यालयाशी संपर्क साधून प्रवेश निश्चित करावा व या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ रा.म.कोल्हे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.        

*****

No comments: