07 January, 2022

चारचाकी वाहन संवर्गासाठी नवीन मालिका सुरु आकर्षक क्रमांक राखीव करण्याचे आवाहन

 

चारचाकी वाहन संवर्गासाठी नवीन मालिका सुरु

आकर्षक क्रमांक राखीव करण्याचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 7 :  उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील यापूर्वीची परिवहोनत्तर खाजगी चारचाकी मोटार वाहन संवर्गातील एमएच-38 व्ही ही मालिका संपुष्टात  आल्यामुळे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने परिवहोनत्तर खाजगी चारचाकी मोटार वाहन संवर्गासाठी नवीन एमएच 38 एडी ही मालिका सुरु केली आहे.

ज्यांना वाहनासाठी आकर्षक क्रमांक राखीव करावयाचा आहे त्यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधून आपला आकर्षक क्रमांक राखीव करुन घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी केले आहे.

0000000

No comments: