10 January, 2022

 

नेहरु युवा केंद्राच्या वतीने ‘‘स्वच्छ ग्राम हरित ग्राम’’ विषयावर युवकांना प्रशिक्षण

 

हिंगोली, (जिमाका) दि. 10 :  नेहरु युवा केंद्र व युवा कार्यक्रम एवं. खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने दि. 6 जानेवारी, 2022 रोजी ‘स्वच्छ ग्राम हरित ग्राम’ या विषयावर युवकांना प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  

या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. बी.एस. क्षीरसागर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. एन.एम. फड, प्रा. डॉ.किशोर इंगोले, प्रा. डॉ.सुधीर वाघ हे उपस्थित होते.

या प्रशिक्षणामध्ये स्वच्छ ग्राम हरित ग्राम या विषयावर ग्रामीण भागातील 40 युवक-युवतींना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना मार्गदर्शकांनी ग्राम पातळीवर स्वच्छ ग्राम हरित ग्राम ही संकल्पना राबवून माहिती द्यावी, त्याचे महत्व समजून सांगावेत. तसेच ग्राम पातळीवर वेगवेगळ्या प्रकारच्या असंख्य समस्या असतात. त्या समस्या लक्षात घेऊन सर्व ग्रामीण लोकांशी संवाद साधावा व त्यांच्याशी चर्चा करुन गावाच्या विकासासंदर्भात जाणीव करुन द्यावी व प्रत्येक व्यक्ती जोडण्याचा प्रयत्न करावा, अशी माहिती या प्रशिक्षणात नेहरु युवा केंद्राच्या स्वयंसेवकांना देण्यात आली. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करुन प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आले. यावेळी नेहरु युवा केंद्राचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक प्रवीण पांडे, नामदेव फरकांडे, संदीप शिंदे, सिंधू केंद्रे, बाळू नागरे यांची उपस्थिती होती. हे प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.

****

No comments: