21 June, 2022

 

संसाधन व्यक्तीची नामिकासूची तयार करण्यासाठी

30 जून पर्यंत अर्ज करावेत

 

हिंगोली (जिमाका), दि.21 : आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न उद्योगांचे उन्नयन योजना (पीएमएफएमई) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत राज्य नोडल एजन्सीच्या वतीने जिल्हास्तरावर लाभार्थ्यांना पाठपुरावा, हाताळणी सहाय्य देण्यासाठी संसाधन व्यक्तीची नामिकासूची तयार करावयाची आहे. त्यासाठी या योजनेच्या मार्गदर्शक सुचनेतील अटी व शर्तीनुसार बंद लिफाफ्यातून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदासाठी शैक्षणिक अर्हता विद्यापीठ, संस्था यांच्याकडील अन्न तंत्रज्ञान, कृषि अभियांत्रिकी मधील पदव्युत्तर, पदवी इत्यादी किंवा कृषि व कृषि संबंधित पदव्युत्तर, पदवी इत्यादी किंवा इतर कोणत्याही शाखेतून पदव्युत्तर, पदवी आवश्यक आहे.

या पदासाठी सेवानिवृत्त बॅक, शासकीय अधिकारी, सनदी लेखापाल, सल्लागार संस्था, बँक मित्र, वैयक्तीक व्यवसायिक, व्यक्ती, विमा प्रतिनिधी तसेच विद्यापीठ, संस्था यांच्याकडील अन्न तंत्रज्ञान, कृषि अभियांत्रिकी  मधील पदव्युत्तर, पदवीधारक, कृषि व कृषि संबंधित पदव्यूत्तर, पदवीधारक आणि इतर कोणत्याही शाखेतून पदव्युत्तर , पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य क्रम देण्यात येईल.

या पदासाठी वरील सर्वांना अन्न व कृषि प्रक्रियेतील उद्योग उभारणीचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनविणे तसेच बँकेशी पाठपुरावा करुन मंजूर करुन घेणे याबाबत अनुभव असणे आवश्यक आहे.

या पदासाठी अर्ज सादर करण्याचा अंतिम दि. 30 जून, 2022 राहील. योजनेच्या मार्गदर्शक सूचना, अर्जाचा नमुना, सविस्तर पात्रता पारिश्रमिक (मानधन) व इतर अटी व शर्ती या जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी , हिंगोली यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. तसेच कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in यावर सुध्दा उपलब्ध आहेत. या पदासाठी संस्था पात्र असणार नाही, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

****   

 

वृत्त  

No comments: