03 June, 2022

 

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज एक योजना अनेक

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

 

             हिंगोली (जिमाका), दि. 03 :  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचा कार्यक्रम महाडीबीटी पोर्टलमार्फत राबविण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यासाठीच्या सन 2022-23 च्या वार्षिक कृति आराखड्यास मंजुरी मिळालेली आहे. त्यामध्ये क्षेत्र विस्तारमध्ये ड्रगन फ्रुट, सुट्टी फुले, हळद लागवड व मशरुम उत्पादन प्रकल्पासाठी भौतिक-101 व आर्थिक-29.60 लक्ष, जुन्या फळबागाच्या पुनरुज्जीवनसाठी भौतिक-34 व आर्थिक-6.80 लक्ष, सामूहिक शेततळे-भौतिक-27 व आर्थिक-89.84 लक्ष,  शेततळे अस्तरीकरण भौतिक- 33 व आर्थिक 24.75 लक्ष, संरक्षित शेती भौतिक-32 व आर्थिक-5.12 लक्ष, मधुमक्षिका पालन- भौतिक-60 व आर्थिक-0.48 लक्ष, शेतकरी प्रशिक्षण-भौतिक-148 व आर्थिक 7.40 लक्ष, पॅक हाऊस भौतिक-12 व आर्थिक- 24 लक्ष, कांदाचाळ- भौतिक-16 व आर्थिक 14 लक्ष, रेपर व्हॅन, रायपनिंग चेंबर, प्राथमिक प्रक्रिया केंद्र प्रत्येकी भौतिक-3 व आर्थिक-54.10 लक्ष, फिरते विक्री केंद्र-भौतिक-13, आर्थिक 1.95 लक्ष असे एकूण भौतिक-479 व आर्थिक- 261.39 लक्ष एवढ्या वार्षिक कृति आराखडयास मंजुरी प्राप्त झालेली आहे.

              जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर 'शेतकरी योजना" या सदराखाली आपला वैयक्तीक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ हे संकेतस्थळ असून या संकेतस्थळावरील 'शेतकरी योजना" हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वत:च्या मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र इत्यादी माध्यमातून महाडीबीटी च्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील. 'वैयक्तीक लाभार्थी’ म्हणून नोंदणी करु इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करुन घ्यावा लागेल.

              यापूर्वीच अर्जदाराने माहिती भरली असल्यास पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी बदल करु शकतात.

              ज्या शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर कृषिविषयक योजनांचा लाभ मिळविण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल. त्यांनी महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ हे संकेतस्थळ अर्ज भरावेत. तसेच अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी व मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांनी केले आहे.

****

No comments: