20 June, 2022

 


राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत  संशयित क्षयरुग्णांची तपासणी करण्यासाठी

फिरत्या एक्सरे व्हॅनचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ

 

हिंगोली (जिमाका), दि. 20 : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यात दि. 20 जून, 2022 पासून ते दि. 12 जुलै, 2022 पर्यंत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात फिरत्या एक्सरे व्हॅनद्वारे संशयित क्षयरुग्णांचे एक्सरे तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेची सुरुवात आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले.

याप्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, अनंतकुमार कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जी. एस. मिरदुडे, सहायक संचालक कुष्ठरोग डॉ. पी. एस. ठोंबरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी प्रशांत तुपकरी, साथरोग अधिकारी डॉ.जाधव, डॉ. गणेश जोगदंड, ज्ञानेश्वर चौधरी यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

*****

No comments: