20 June, 2022

 

वसतिगृह चालविण्यासाठी इच्छूक संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत

 

हिंगोली (जिमाका), दि. 20 : उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या  दि. 13 जुलै, 2018 व दिनांक 09 ऑक्टोबर, 2018 च्या पत्राअन्वये  डॉ. पंजाबराव देशमूख वसतिगृह निर्वाह भत्ता योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी वसतिगृह चालविण्यासाठी हिंगोली जिल्हा मुख्यालयी जिल्हा पोलीस मुख्यालयाची जुनी इमारत रेल्वे स्टेशन रोड हिंगोली येथे नोंदणीकृत संस्थाकडून वसतिगृह चालविण्यासाठी  प्रस्ताव मागविण्यात आले होते. परंतु विहित मुदतीत एकही प्रस्ताव प्राप्त झाला नसल्यामुळे नोंदणीकृत संस्थेस प्रस्ताव सादर करण्यास पंधरा दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

इच्छुकांनी वृत्त प्रकाशित झाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत निवासी उपजिल्हाधिकारी  हिंगोली  यांच्या नावाने (बंद लिफाफे मध्ये वसतिगृह चालविण्या बाबतचा प्रस्ताव सर्व साधारण अटी व इतर पुरक माहितीसह व कागदपत्राच्या प्रतीसह जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक-जावक शाखा यांचेकडे समक्ष सादर करुन पोहोच घेण्यात यावी.

निवड केलेल्या नोंदणीकृत संस्थेस दि. 9 ऑक्टोबर, 2015 च्या शासन निर्णयानुसार हे वसतिगृह चालविण्यासाठी कोणत्याही स्वरुपाचे अनुदान शासनाकडून देण्यात येणार नाही. वसतिगृहामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याकडून प्राप्त होणाऱ्या शुल्कामधुन वसतिगृहाचा सर्व प्रकाराचा खर्च भागविण्याची जबाबदारी संबंधित नोंदणीकृत संस्थेची राहील.

शासन निर्णय महाराष्ट्र शासन www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर व सर्वसाधारण अटी व इतर पुरक माहितीचा मसुदा कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर, जिल्ह्यांच्या https://hingoli.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी  माहिती निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

*****

No comments: