08 June, 2022

असंघटीत क्षेत्रातील कामगार व्यक्तींनी ई- श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

 असंघटीत क्षेत्रातील कामगार व्यक्तींनी

ई- श्रम पोर्टलवर  नोंदणी करण्याचे आवाहन

 

            हिंगोली, (जिमाका ) दि.8:   असंघटीत  कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरविण्याच्या उद्देशाने असंघटीत कामगारांच्या राष्ट्रीय डेटाबेस (NDUW) तयार करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने दिनांक 26 ऑगस्ट 2021 पासून असंघटीत कामगारांची नोंदणी करण्याकरीता ई श्रम पोर्टलचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. या राष्ट्रीय  डेटाबेस  च्या  आधारावर असंघटीत कामगारांकरिता सामाजिक सुरक्षा योजना अंमलात आणल्या जातील.

          सद्य:स्थितीत NDUW (National Detabase for Unorganised Workers) अंतर्गत नोंदणीकृत कामगारास प्रधानमंत्री सुरक्षा विमा लागू राहील. नोंदणीकृत कामगारांचा एक वर्षाचा प्रीमियम रु. 12/- केंद्र

शासनामार्फत भरला जाईल. हिंगोली जिल्ह्यासाठी 4 लाख 94 हजार 303 एवढे असंघटीत कामगारांच्या नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

 

        असंघटीत क्षेत्रात उसतोड कामगार, सुतारकाम करणारी व्यक्ती, बांधकाम कामगार,शेतीकाम  करणारी  व्यक्ती, घरकाम करणारी महिला, आशा  सेविका  व अंगणवाडी सेविका, ऑटो चालक/ रिक्षा चालक, नाव्ही कामगार, वृतपत्र विक्रेते,दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी, रस्त्यावरील विक्रेते, पीठ गिरणी कामगार ,पेंटर, इलेक्ट्रिशिअन, प्लंबर, ब्युटी पार्लर कामगार महिला, लहान शेतकरी, मनरेगा मजूर                            फेरीवाले, भाजीवाला, फळवाले, पशुपालन करणारे कामगार,वीटभट्टी कामगार, माथाडी कामगार                                      चहा विक्रेते  अशा विविध क्षेत्रातील 300 कामगार व्यक्तींचा समावेश होतो.

 

        नोंदणी करिता पात्रता - असंघटीत क्षेत्रामध्ये काम करणारा वय वर्षे 16 ते 59 दरम्यानचा कामगार,     आयकर भरणारा नसावा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी राज्य विमा योजनेचा सभासद नसावा, असंघटीत कामगार शासनाने निश्चित केलेल्या 300 उद्योगातील असणे आवश्यक आहे.

 

        नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे- आधार कार्ड,बँक पासबुक (राष्ट्रीय बँक अथवा IFSC कोड असलेली इतर कोणतीही बँक), सक्रीय मोबाईल क्रमांक, स्वंय नोंदणी करण्यासाठी कामगाराचा सक्रीय मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.

 

        नोंदणी कोठे करावी- स्वतः, नागरी सुविधा केंद्र(CSC), कामगार सुविधा केंद्र, eSHRAM Portal URL:eshram.gov.in चौकशी साठी हेल्पलाईन क्रमांक -राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर- 14434 तर  टोल फ्री नंबर- 18001374150.

             केंद्र शासनाच्या कामगार व रोजगार मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार असंघटीत कामगारांची नोंदणीची कार्यपद्धती - नागरी सुविधा केंद्रामार्फत बँक खात्याचा तपशील, ई-मेल आयडी, वारसाचा तपशील व सक्रीय मोबाईल क्रमांकाबाबतचा तपशील अद्यावत केला जाईल, कामगाराची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यास कामगारास नागरी सुविधा केंद्रातील (CSC) प्रतिनिधीकडून A4 साईज पेपरवर UAN कार्ड काढून देण्यात येईल, कामगारांना नवीन नोंदणी करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. परंतु कामगारास           कोणतीही माहिती अद्यावत करावयाची असल्यास रु. 20/- नागरी सुविधा केंद्रातील प्रतिनिधीकडून           आकारले जातील, कामगाराची नोंदणी झाल्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) चे वार्षिक अंशदान  रु. 12/- केंद्र शासनामार्फत अदा करण्यात येईल.

           हिंगोली जिल्ह्यासाठी देण्यात आलेले 4 लाख 94 हजार 303 एवढे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व जिल्हा कार्यालय प्रमुख यांनी त्यांच्या अधिनस्थ क्षेत्रीय यंत्रणा (तलाठी, ग्रामसेवक इ.) यांच्या माध्यमातून तसेच नागरी सुविधा केंद्राचे जिल्हा प्रबंधक यांनी कामगारांसोबत बैठकांचे आयोजन करून मार्गदर्शन करावे. तसेच  नमूद असंघटीत क्षेत्रातील कामगार व्यक्ती यांनी ई- श्रम पोर्टलवर मोठ्या प्रमाणावर नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर , हिंगोली यांनी केले आहे.

0000000

 


No comments: