01 August, 2019

बचत गटांसाठीच्या 'प्रज्ज्वला' चे हिंगोली मध्ये प्रशिक्षण कार्यक्रम


बचत गटांसाठीच्या 'प्रज्ज्वला' चे हिंगोली मध्ये प्रशिक्षण कार्यक्रम  

हिंगोली,दि.1: राज्यभरातील महिला बचत गटांची आर्थिक, सामाजिक आणि कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘प्रज्वला योजना राबविण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातील प्रशिक्षण कार्यक्रम दि.10 ऑगस्ट, 2019 रोजी हिंगोली येथे होणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
ज्यामध्ये सुमारे ३ लाख बचत गट असून त्यांच्याशी सुमारे साठ लाख महिला जोडलेल्या आहेत. हे बचत गट आर्थिक सक्षमीकरणाचा कणा असल्याने आयोगाने बचत गटांना आणखी सक्षम करण्यावर भर दिला आहे. त्यातून प्रज्ज्वला योजना आकारास आली आहे. प्रज्वला योजनेतंर्गत पहिल्या टप्प्यात बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देण्यात येत असून दुसऱ्या टप्प्यात ‘एक जिल्हा, एक वस्तु’ असे क्लस्टर्स तयार करण्यात येणार आहेत. त्यातून प्रत्येक जिल्ह्याला एक ओळख आणि महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. तिसऱ्या टप्प्यात बचत गटांच्या उत्पादनांना शाश्वत बाजारपेठ मिळण्यासाठी ‘बचत गट बाजार’ जिल्ह्याच्या ठिकाणी उभारण्याचे नियोजन आहे., अशी माहिती आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांनी दिली आहे.
या योजनेसाठी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार आणि महिला व बाल कल्याण मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले. 
आतापर्यंत ‘प्रज्वला’ प्रशिक्षण कार्यक्रम नंदुरबार, धुळे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, अहमदनगर, नांदेड, परभणी, जळगाव, अकोला, वाशीम, पालघर, भंडारा या जिल्ह्यात झाले आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातील प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांच्या प्रमुख उपस्थित होणार असून कार्यक्रमांचा तपशील पुढील प्रमाणे.
अ.क्र.
दिनांक
वेळ
स्थळ
उपस्थिती
01
10.08.2019
स.10.00 ते दु.01.00
हिंगोली
स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच अन्य मान्यवर.

****

No comments: