14 August, 2019

बाल शक्ती व बाल कल्याण पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन


बाल शक्ती व बाल कल्याण
पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

हिंगोली,दि.14 : केंद्र शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाकडून बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. बाल शक्ती पुरस्कार  हा ज्या मुलांनी क्रीडा,कला,संस्कृती,समाजसेवा,शौर्य इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे अशा मुलांना हा पुरस्कार देण्यात येतो. तसेच बाल कल्याण पुरस्कार हा ज्या व्यक्ती व संस्थांनी बाल विकास,बाल संरक्षण,बाल कल्याण इत्यादी क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेले आहे अशा व्यक्ती व संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो.
दोन्ही पुरस्कारासंबंधीच्या मार्गदर्शक सुचना www.nca-wcd.nic.in  या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तरी इच्छुकांनी त्यांचे ऑनलाईन अर्ज  www.nca-wcd.nic.in  या वेबसाईटवर दिनांक 31ऑॅगस्ट,2019 पर्यंत पाठवावेत,असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

****

No comments: