02 August, 2019

एअर मार्शल व्ही.ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कार


एअर मार्शल व्ही.ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कार

हिंगोली,दि.2: सर्व माजी सैनिक विधवांना कळविण्यात येत की, शैक्षणिक वर्षे 2018-19 मध्ये इ. 10 वी व ई. 12 वी बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना एअर मार्शल व्ही.ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कार निवडीसाठी अर्ज सादर करावयाचे आहेत. सदर अर्ज हे दिनांक 16 सप्टेंबर 2019 पूर्वी या कार्यालयात संपर्क साधावा व योना सोबत ओळखपत्राची छायांकित प्रत, चालू वर्षी शिकत असल्याचे बोनाफाईड सर्टीफिकेट, 10 वी /12 वी बोर्डाच्या परीक्षेच्या  गुणपत्रिकेची छायांकित प्रत, डिस्चार्ज पुस्तकात कुटुंबाची  नावे असलेल्या पानाची छायांकित प्रत , आर्थिक मदतीच्या हिरव्या कार्डची छायांकित प्रत, राष्ट्रीयीकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत व आधार कार्डची छायांकित प्रत, तरी वरील संधीचा जास्तीत जास्त माजी सैनिक विधवांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली यांनी केले आहे.
***

No comments: