01 August, 2019

जिल्हाधिकारी कार्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन





जिल्हाधिकारी कार्यालयात
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

            हिंगोली,दि.1: येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
            यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) गोविंद रणविरकर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगांवकर, जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्रीराम पारवेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी ही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
*****


No comments: