14 August, 2019

पालकमंत्री अतुल सावे यांचा जिल्हा दौरा


पालकमंत्री अतुल सावे यांचा जिल्हा दौरा

        हिंगोली, दि.14: उद्योग आणि खनिकर्म, अल्पसंख्यांक विकास व वक्फ विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.  त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
            बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी  10.45 वाजता हिंगोली शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, सकाळी 11.00 वाजता प्रादेशिक परिवहन विभाग उपप्रादेशिक परिवहन नुतन इमारतीचे उद्घाटन  समारंभास  उपस्थिती, दुपारी 12.00 वाजता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती, सोईनुसार हिंगोली शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.
            गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 8.45 वाजता हिंगोली शासकीय विश्रामगृह येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण, सकाळी 9.00 वाजता ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली ), सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून शेणगावकडे प्रयाण, सकाळी 11.30 वाजता मौजे लिंगदरी ता. शेणगाव, जि. हिंगोली येथील घरकुल योजना व जिल्हा प्राथमिक शाळा लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.00 वाजता शेणगाव येथून शासकीय विश्रामगृह हिंगोलीकडे प्रयाण व राखीव , दुपारी 2.30 वाजता सोईनुसार शासकीय वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण .
00000


No comments: