02 August, 2019

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा श्रीमती ज्योतीताई ठाकरे यांचा जिल्हा दौरा



महिला आर्थिक विकास महामंडळाच्या
अध्यक्षा श्रीमती ज्योतीताई ठाकरे यांचा जिल्हा दौरा

हिंगोली,दि.2: महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा श्रीमती ज्योतीताई ठाकरे ह्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2019 रोजी रात्री 8.00 वाजता हिंगोली येथे आगमन व शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम. शनिवार दिनांक 3 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 9 ते 11.00 वाजे दरम्यान शासकीय विश्रामगृह ते औंढा मार्गे वसमत येथील ओम गार्डन आसेगाव रोड वसमत येथे, सकाळी 11.00 ते 1.00 वाजे दरम्यान ओम गार्डन आसेगाव रोड वसमत येथे महिला बचत गटांना कर्ज रकमेचे धनादेश वाटप कार्यक्रम व NULM   योजनेअंतर्गत बचत गटांना खेळते भांडवलाचे धनादेश वाटप कार्यक्रम, सायंकाळी 6.00 ते 6.30 वाजे दरम्यान कळमनुरी ते हिंगोली प्रवास, सायंकाळी 6.30 ते 7.30 वाजे दरम्यान हिंगोली येथे चौक सभा.
****


No comments: