14 August, 2019

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

हिंगोली,दि.14: इतर मागासवर्ग सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाकडून राज्यातील विविध क्षेत्रात  उल्लेखनीय  काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना महात्मा बसवेश्वर सामाजिक समता –शिवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची योजना कार्यान्वित  केलेली आहे.
त्याअनुषंगाने  उपरोक्त पुरस्काराचा लाभ मिळण्यासाठी अर्जाचा नमुना सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा सामान्य  रुग्णालयाच्या पूर्व बाजूस, दर्गा रोड, हिंगोली येथे  उपलब्ध असून परिपूर्ण प्रस्ताव  दिनांक 27 ऑगस्ट 2018 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण , हिंगोली यांनी केले आहे.

****

No comments: