26 March, 2021

कोणत्याही लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे धान्य वितरीत होणार नाही दक्षता घेण्याचे तहसीलदारांना आदेश

 


 

हिंगोली, (जिमाका) दि. 26 : माहे मार्च-एप्रिल 2021 या कालावधीतील हिंगोली जिल्ह्यासाठी मिळणाऱ्या धान्यामधील मक्याच्या दर्जाबाबत झालेल्या तक्रारीच्या व वृत्तपत्रातील बातमीच्या अनुषंगाने सर्व तहसीलदार यांचा अभिप्राय मागविण्यात आला होता. तहसीलदार यांनी कळविल्यानुसार तहसील गोदामामध्ये निकृष्ट दर्जाचा मका आढळून आलेला नसल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिली आहे.

परंतु वसमत गोदामामध्ये 10 ते 12 बॅग हे थोडे पीठ असल्याप्रमाणे आढळून आलेले आहेत. याबाबत  तहसीलदार वसमत यांनी सदर धान्य हे चाळणी करुन लाभार्थ्यांना वाटप करणे योग्य होईल, असे कळविले आहे.

कोणत्याही लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे धान्य वितरीत होणार नाही या बाबत दक्षता घेण्यासाठी सर्व तहसीलदारांना  कळविले असल्याचेही  जिल्हा पुरवठा अधिकारी  यांनी  प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे .

****

No comments: