01 March, 2021

कामगारांना किमान वेतनापेक्षा कमी दराने वेतन देऊ नये सरकारी कामगार अधिकारी यांचे आवाहन

 


 

हिंगोली, (जिमाका) दि. 01 : कामगार विभागाने सन 2020-21 मध्ये किमान वेतन अधिनियम-1948 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी  दिनांक 22 फेब्रुवारी, 2021 ते 28 फेब्रुवारी, 2021 या कालावधीत जनजागृती अभियान राबविण्याचे आदेश राज्य कामगार आयुक्तांनी दिले होते.

त्याअनुषंगाने सरकारी कामगार अधिकारी, हिंगोली यांच्यातर्फे दि. 26 फेब्रुवारी, 2021 रोजी एम.आय.डी.सी. लिंबाळा परिसरातील कारखाने, उद्योग, विटभट्टी उत्पादक उद्योग आणि इतर असंघटीत क्षेत्रात किमान वेतन अधिनियम-1948 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात आले.

या अभियानात जिल्ह्यातील मालक वर्ग यांनी कामगारांना किमान वेतनापेक्षा कमी दराने वेतन देण्यात येवू नये, असे सरकारी कामगार अधिकारी  टी. ई. कराड यांनी आवाहन केले .

या अभियानास येथील सरकारी कामगार अधिकारी  टी. ई. कराड , दुकाने निरीक्षक जी.एस.जडे, नितीन दवंडे, तसेच मालक व कामगार वर्ग उपस्थित होते.

*****

No comments: