17 March, 2021

हिंगोली शहरी व ग्रामीण क्षेत्रात कंटेनमेंट झोन घोषित

 


हिंगोली, (जिमाका) दि. 17 : हिंगोली शहरातील सराफ गल्ली, रिसाला, पेन्शनपुरा, लाला लचपतराय नगर, तिरुपती नगर, रामाकृष्णा नगर, विवेकानंद नगर, सिध्दार्थ नगर, भोईपुरा, यशवंतनगर, शिवराज नगर, जिजामाता नगर, एनटीसी, रेल्वे स्टेशन रोड, शिवाजी नगर, बांगर नगर, सरस्वती नगर, सराफ बाजार, रिसाला, कोमटी गल्ली, लाला लचपतराय नगर, जुने पोलीस स्टेशन, विद्यानगर, मस्तानशाह नगर या भागातील कोरोना पॉझिटीव्ह घराच्या आजूबाजूच्या 500 मीटर पर्यंतचा परिसर. तर ग्रामीण क्षेत्रातील पांगरी, बळसोंड, सुराणा नगर, डिग्रस कऱ्हाळे, बासंबा, उमरा, गंगानगर, आनंद नगर, भिराडा, रामाकृष्णा नगर, वैजापूर, हानवत खेडा, बोराळा, डिग्रस वाणी, बोरजा, अमला या गावात कोविड-19 चे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या रोगाचा फैलाव इतरत्र होऊ नये म्हणून वरील गावाचे संपूर्ण क्षेत्र हे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. 

या परिसरातील नागरिकांच्या हालचालींवर बंधने घालण्यात आली आहेत. या परिसरातील सर्व आवश्यक त्या सेवा या आदेशान्वये बंद करण्यात आल्या आहेत. नागरिकांना आवश्यक त्या सेवा   ग्रामपंचायत मार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत.

            या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) चे कलम 188 व साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

****

 

 

No comments: