12 March, 2021

सोशल मिडियावरील बनावट मॅसेजला नागरिकांनी बळी पडू नये जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचे आवाहन

 

 

हिंगोली, दि. 12 (जिमाका) : दि. 01 मार्च,2020 ते 28 फेब्रुवारी , 2021 या कालावधीत ज्या महिलांच्या घरातील 21 ते 70 या वयोगटातील कर्त्या व्यक्तीचे कोरोनाने निधन झाले आहे, अशा विधवा झालेल्या महिलांना महिला व बालविकास विभागाच्या जिजामाता, जिजाऊ या योजनेंतर्गत 50 हजार रुपये प्रती लाभार्थी वर्षाला मिळतील. तसेच अधिक माहितीसाठी पूजा रमेश पाटील व उर्फ पूजा आकाश ठक्कर , मोबाईल नंबर : 7016169045 या क्रमांकावर सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेत संपर्क साधावा, अशी पोस्ट व्हॉट्सअप या सोशल मिडियावर व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

ही पोस्ट खोटी व बनावट असून अशा प्रकारची कोणतीही योजना महिला व बालविकास विभागामार्फत कार्यान्वित नाही. तथापि, या मेसेजमुळे नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेता या मॅसेजला नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन विठ्ठल शिंदे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली  यांनी केले आहे.

                                                                        ***** 

No comments: