17 March, 2021

सी.सी.सी., डी.सी.एच.सी., डी.सी.एच. चे काम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी संबंधित विविध अधिकाऱ्यांवर सोपविली जबाबदारी

 


 

           हिंगोली, (जिमाका) दि. 17 : राज्यात कोविड-19  प्रतिबंधक उपचारासाठी केंद्र शासनामार्फत विविध उपाययोजना राबविण्याच्या सूचना प्राप्त होत आहेत. त्यानुसार आरोग्य विभागाकडून सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. कोविड-19 आजाराच्या उपचारासाठी ताप उपचार केंद्र, कोविड संशयित रुग्ण कक्ष आणि कोविड विलगीकरण कक्ष याप्रमाणे त्रिस्तरीय रचना तयार करण्यात आलेली आहे.

              सी.सी.सी. , डी.सी.एच.सी., डी.सी.एच. चे काम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी  संबंधित विविध अधिकाऱ्यांवर नियोजन करण्याची जबाबदारी सोपविली आली आहे.

              सी.सी.सी. मध्ण्ये बेडनुसार कॉट, गाद्या, बेडसीट (3 प्रती रुग्ण), चादर (2 प्रती रुग्ण ) उपलब्ध करुन देणे तसेच सी.सी.सी.मध्ये भरती असलेल्या रुग्णांच्या संख्येनुसार दैनंदिन आहार सुविधा (चहा, नास्ता व दोन वेळचे जेवण पुरविणे) पुरविण्याची जबाबदारी संबंधित तहसीलदार यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

              आऊट सोर्सिंगमार्फत नेमलेल्या कर्मचाऱ्यामार्फत  सी.सी.सी.ची साफ सफाई करुन घेणे, निवड केलेल्या सी.सी.सी. केंद्रावर पिण्याचे पाणी व वापरण्याचे पाण्याची व्यवस्था करणे व अनुषंगींक कामे, सी.सी.सी. मध्ये 24 तास विद्युत उपलब्ध ठेवण्याची जबाबदारी मुख्याधिकारी, नगर परिषद/नगर पंचायत यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

              सी.सी.सी.साठी लागणारी औषधी , वैद्यकीय उपकरणे, स्वॅब कलेक्शनसाठी लॉजिस्टीक उपलब्ध करुन घेणे, स्वॅब पाठविणे, रिपोर्ट कलेक्ट करणे, नोंदी ठेवणे व पुढील कार्यवाही करणे, सी.सी.सी. मधून रुग्णांना संदर्भीत करण्यासाठी वाहन व्यवस्था करणे, अतुल एजन्सी जालना यांच्याशी संपर्क करुन बायोमेडिकल वेस्टचे नियोजन करण्याची जबाबदारी संबंधित वैद्यकीय अधीक्षक यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

              गरजेनुसार समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांचे रोटेशन प्रमाणे आदेश काढणे, आदेश काढताना 07 दिवसाचेच आदेश काढावेत, जेणेकरुन 07 दिवसाची प्रतीनियुक्ती संपवून आपापच्या कार्यक्षेत्रात कार्यरत राहतील याची दक्षता घेणे, जेणेकरुन नॉन कोविड आरोग्य कामावर परिणाम होणार नाही. तालुक्यात सर्व नॉन कोविड सेवा सुरु राहतील याची खबरदारी घेणे, सी.सी.सी. येथे कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देऊनच रुजू करुन घेणे. तसेच कोविड पॉझिटीव्हचे कॉन्टॅक्ट ट्रेसींग करणे, कन्टेटमेंट झोन व बफरझोन तयार करणे, सर्व्हे करणे व दैनंदिन अहवाल पाठविण्याची जबाबदारी  तालुका आरोग्य अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

            सी.सी.सी. कोविड-19 ॲन्टीजन टेस्टींग व आर.टी.पी.सी.आर टेस्टींग व  आर.टी.पी.सी.आर टेस्टींग कॅम्प ठिकाणी रोटेशन प्रमाणे पोलीस कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावणे, रुग्ण सी.सी.सी. मध्ये भरती करताना व डिस्चार्ज करताना पथकास मदत करण्याची जबाबदारी संबंधित पोलीस निरीक्षक यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

           सी.सी.सी.मधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर होम क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात आलेल्या व्यक्तीची दैनंदिनी दूरध्वनीद्वारे फालोअप घेणे व रजिस्टरमध्ये त्याची नोंद ठेवणे. तसेच कार्यक्षेत्रातील कोविड-19 चे लसीकरण वाढविण्याच्या दृष्टीने ज्येष्ठ नागरिक व कोमार्बीड व्यक्तींची यादी करुन जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण करुन घेण्याची जबाबदारी संबंधित कार्यक्षेत्रातील शिक्षकावर सोपविण्यात आली आहे.

            सी.सी.सी.मधून डिस्चार्ज करण्यात आलेल्या कोविड रुग्णांना वेळोवेळी चेकअप करण्यासाठी दैनंदिन फॉलोअप ओपीडी सुरु करणे, गरज भासल्यास प्रयोगशाळा तपासण्या करुन घेणे व स्वतंत्र रजिस्टर करुन त्याची नोंद ठेवणे याची जबाबदारी  सी.सी.सी. च्या इन्चार्ज वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

             कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्याच्या अनुषंगाने इन्चार्ज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दैनंदिनी दुपारी 3.00 वाजता रिक्त असलेल्या खाटांची संख्या प्रेसनोटसाठी डॉ.देवेद्र जायभाये यांच्याकडे दररोज अहवाल सादर करण्याची जबाबादरी  डी.सी.एच., डी.सी.एच.सी., सी.सी.सी. चे इन्चार्ज वैद्यकीय अधिकारी  यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

             आपल्या अधिनस्त आरोग्य सेवक व आरोग्य कर्मचारी यांच्या कार्यक्षेनिहाय लावून दिलेल्या ड्यूटीनुसार डिस्चार्ज झालेल्या कोविड रुग्णांच्या घरावर स्टीकर लावण्याची जबाबादारी  देणे व गृहभेटी दरम्यान कुटुंबातील सदस्यांना आरोग्य सल्ला व सेवा देण्याची जबाबदारी साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश जोगदंड  यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

              वरील सर्व बाबींची गटनिहाय काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रत्येक गटनिहाय सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांचा व्हॉटसअप ग्रुप तयार करण्यात यावा व कुठलाही कोविड-19 चा रुग्ण आरोग्य सेवेला वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी , हिंगोली यांनी दिले आहेत.

            या आदेशाची आवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे माननण्यात येईल व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आदेशात नमूद केले आहे.

*****

No comments: