17 November, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही, तर 01 रुग्णाचा मृत्यू

04 रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली (जिमाका), दि. 17 : जिल्ह्यात  कोविड-19 चा नवीन एकही पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आलेला नाही, तर आज 01 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्य झाला आहे. तसेच 04 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 55 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 656 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 04 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 395 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

*******

No comments: