22 November, 2021

 




जिल्हा ग्रंथालयात दिवाळी अंक प्रदर्शनाचे उदघाटन

 

           हिंगोली (जिमाका), दि. 22 : - दरवर्षी दि. 14 ते 20 नोंव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय ग्रंथ सप्ताह साजरा करण्यात येतो.  त्यानिमित्ताने दिवाळीमध्ये प्रकाशित झालेल्या विविध दिवाळी अंकाच्या प्रदर्शनाचे आयोजन येथील जिल्हा ग्रंथालयात करण्यात आले होते. या दिवाळी अंक प्रदर्शनाचे उदघाटन हिंगोलीचे तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

          या वेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, अशोक अर्धापुरकर, कलानंद जाधव, संतोष ससे, मुळे, मिलींद सोनकांबळे, रामभाऊ पुनसे  व ग्रंथालय पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रदर्शनामध्ये सुमारे 100 पेक्षा अधिक दिवाळी अंक उपलब्ध असून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरु नगर, रिसाला नाका, हिंगोली येथे सर्वांसाठी खुले असून सर्वांनी या दिवाळी अंक प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.

****

No comments: