12 November, 2021

महाबीज सोयाबीन बिजोत्पादन योजनेअंतर्गत नोंदणी करण्याचे आवाहन

 

 

महाबीज सोयाबीन बिजोत्पादन योजनेअंतर्गत नोंदणी करण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 12 (जिमाका) : महाबीज मार्फत उशिरा  रब्बी/उन्हाळी 2021-22 हंगाम सोयाबीन बिजोत्पादन कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून इच्छूक शेतकऱ्यांनी  जिल्ह्यातील महाबीज कार्यालयाशी संपर्क साधून आपले आरक्षण नोंदणी करुन योजनेचा लाभ घ्यावा.  

पात्र बियाणे खरेदी धोरण खरीप 2021 उत्पादीत सोयाबीन बियाणे अंतिम दर + त्यावेळचा बाजार भाव आधारित प्रोत्साहनपर रक्कम, सोयाबीन वाण एमएयुएस-158, एनएयुएस-612, एमयुएस-162, एमसयुएस-17 इत्यादी .

यासाठी तालुकानिहाय सहायक क्षेत्र अधिकारी यांचे संपर्क क्रमांक - हिंगोली तालुका संपर्कासाठी मो. नं. 8788417408, सेनगाव तालुका संपर्कासाठी मो. नं. 9405037001, कळमनुरी संपर्कासाठी मो. नं. 7219595950, औंढा संपर्कासाठी मो. नं.8208031650, वसमत संपर्कासाठी मो. नं.9511869084. या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून  आजच नोंदणी  करुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, हिंगोली यांनी केले आहे.

0000000

 

No comments: