18 November, 2021

 

औंढा (ना) येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातील युवकांसाठी

 मोफत दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम

 

हिंगोली (जिमाका), दि. 18 : उद्योग संचालनालय, उद्योग विभाग, महाराष्ट्र शासन पुरस्कृत जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली ( एमसीईडी ) यांच्या वतीने औंढा (ना.) येथे अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील युवकांसाठी मोफत डेअरी दुग्ध व्यवसाय  प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

इच्छुक मुलांनी यासाठी फोटो , आधार कार्ड , बँक पासबुक व शाळा सोडल्याचा दाखला महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र , हिंगोली येथे जमा करुन आपल्या नांवाची नोंदणी करुन घ्यावी . मुख्यमंत्री रोजगार योजना, पंतप्रधान रोजगार योजना व शासनाच्या विविध योजनेच्या अनुदानासाठी या प्रमाणपत्राचा उपयोग करता येणार आहे. तसेच यामध्ये शासकीय, निमशासकीय संस्थांच्या कर्ज व अनुदान विषयक योजनेच्या माहितीबाबत मार्गदर्शन, उद्योग निवड, बाजारपेठ पाहणी, यशस्वी उद्योजकाचे गुण, संभाषण कौशल्य व व्यक्तीमत्व विकास, उद्योग व्यवस्थापन व प्रकल्प अहवालाची माहिती तसेच यशस्वी उद्योजकांचे व उद्योग अधिकारी यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. प्रवेश मर्यादित असल्यामुळे आपला प्रवेश दि. 23 नोव्हेंबर, 2021 पर्यंत निश्चित करण्यात यावा. नांव नोंदणीसाठी विकास उंडाळ, कार्यक्रम समन्वयक, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ( एमसीईडी ) , दुसरा मजला प्रशासकीय इमारत , जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली . मो.नं. 9325282463 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शंकर पवार, प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र , हिंगोली ( एमसीईडी) यांनी केले आहे .

*****

No comments: