23 November, 2021

 


जिल्हास्तरीय खो-खो, कबड्डी व बास्केटबॅाल क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन संपन्न

 

                हिंगोली (जिमाका), दि. 23 : - येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आज दिनांक 23 नोव्हेंबर 2021 रोजी खेलो इंडिया अंतर्गत जिल्हास्तरीय खो-खो, कबड्डी, बॅास्केटबॅाल या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते प्रा.डॉ.बंकट यादव यांच्या हस्ते आज संपन्न झाले. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी कलीमोद्दीन फारुखी तर प्रमुख पाहुणे म्हणून हिंगोली जिल्हा कब्बडी असोसिएशनचे सहकार्यवाह प्रा. डॅा. नवनाथ लोखंडे, जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी दत्तराव बांगर, कबड्डी राष्ट्रीय खेळाडू शेर खाँन पठाँण, राष्ट्रीय खेळाडू खो-खो तथा जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते सुरज रविशंकर शिंदे, शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रमेश गंगावणे,  जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते रामप्रसाद व्यवहारे, जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी शिवाजी इंगोले, शेख रिजवान उपस्थित होते.

चौथ्या खेलो इंडिया नॅशनल गेम्सचे आयोजन दिनांक 05 फेब्रुवारी 2022 या कालावधीत हरीयाणा या ठिकाणी निश्चित झालेले आहे. या स्पर्धेचे संघ तयार करण्यासाठी आज जिल्हास्तरीय स्पर्धां आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेतून निवड चाचणीव्दारे संघ निवडण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक खेळाची निवड समिती तयार करण्यात आली आहे. यामध्ये निवडण्यात आलेला संघ विभागस्तरावर हिंगोली जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

यासाठी निवड समिती सदस्य म्हणून मारोती अलकटवार तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कबड्डी संघटनेचे तज्ञ पंच म्हणून मेहराज पठाण, गणपत नरवाडे, विशाल शिंदे, सत्य प्रकाश नांदापुरकर, ज्योतीराम चव्हाण, शिवशंकर कापसे, बाबुराव साळुंके, बल्लु पठाण, मोतीराम कोरडे, श्रीमती मायादेवी सरवदे, रामदास हनुमंते उपस्थित होते. तर खो-खो तज्ञ पंच म्हणून अमोल मुटकुळे, नरेंद्र रायलवार, संजय भुमरे, सुशील इंगोले, निलेश मुळे, अर्जुन पिंपरे हे उपस्थित होते.

            स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा कार्यालयातील क्रीडा अधिकारी शैलेंद्रसिंह गौतम, संजय बेतीवार, मारोती सोनकांबळे, जिल्हा संघटक जयवंता असोले, शेख वसीम, कनिष्ठ लिपीक बालाजी नरोटे, क्रीडा मार्गदर्शक विजय जाधव, प्रमोद देव, शिरसाठ सर, प्रदीप कदम, अर्जुन पवार यांनी सहकार्य केले. 

*******

No comments: