24 November, 2021

 

तृतीय पंथीयांनी ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळविण्यासाठी

अर्ज करण्याचे आवाहन

 

           हिंगोली (जिमाका), दि. 24 : - तृतीय पंथीयांचे कल्याण व हक्कांचे संरक्षण अंतर्गत पात्र तृतीयपंथी यांनी ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळविण्यासाठी  नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन या वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव तथा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण शिवानंद मिनगीरे यांनी केले आहे.

               तृतीय पंथीयांचे कल्याण व हक्कांचे संरक्षण अधिनियम 2019 मधील नियम 2020 अंतर्गत जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र अदा करण्याची तजवीज आहे. त्याअनुषंगाने सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार यांच्यामार्फत राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टल सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पात्र तृतीयपंथीयांनी नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन (National Portal For Transgender Persons)  https://www.transgender.dosje.gov.in/Applicant/Login/index  या वेबसाईटला भेट देऊन अप्लॉय ऑनलाईन यावर आपला युजर आयडी व पासवर्ड तयार करुन माहिती भरावी.

               ऑनलाईन अर्जासोबत आयकार्ड साईझ फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी, आपण तृतीयपंथी असल्याबाबतचे प्रमाणपत्र (बॉन्डवर) व इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत संलग्न करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.  

*****

No comments: