30 November, 2021

 

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त

जिल्ह्यात 5 डिसेंबर रोजी वनराई बंधारे निर्मितीचा कार्यक्रम

 

            हिंगोली, (जिमाका) दि. 30 :  भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात विविध नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. सन 2021-22 मध्ये लांबलेला पावसाचा हंगाम व विस्तृत पर्जन्यमान विचारात घेऊन आगामी उन्हाळी हंगामामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू नये यासाठी विकेंद्रीत जलसाठे निर्मितीवर भर देणे आवश्यक आहे. लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुसंख्य ओढे, नाले अद्यापही प्रवाहीत आहेत. वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून प्रवाहीत नाल्यामध्ये लोकसहभागातून विकेंद्रीत जलसाठे निर्माण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

वनराई बंधाऱ्याचा कार्यक्रम जिल्ह्यात सर्वत्र एकाच दिवशी म्हणजे दि. 5 डिसेंबर, 2021 रोजी आयोजित करण्यात आले आहे. त्यादृष्टीने सर्व संबंधित विभागाने आवश्यक ते पूर्वनियोजन करुन जिल्ह्यात विक्रमी संख्येने वनराई बंधारे होतील, असे पहावे.  निवडक कार्यक्रमांना जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी भेट देणार आहेत. तसेच नागरिकांनी देखील श्रमदानाद्वारे आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवून योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

*****

No comments: