10 July, 2023

 

तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारासाठी नामांकने सादर करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 10 : केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व खेल मंत्रालयाद्वारे दरवर्षी साहसी पुरस्कारांतर्गत तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो. तेनझिंग नॉर्गे साहसी पुरस्कार-2022 साठी                दि. 14 जुलै, 2023 पर्यंत नामांकने मागविण्यात आलेली आहेत.

तेनझिंग नॉर्गे या पुरस्कारासाठी https://awards.gov.in या पोर्टलवर भेट देऊन ऑनलाईन नामांकने (अर्ज ) सादर करावेत.  या पुरस्कारासाठी नामांकने सादर करणाऱ्या खेळाडूंची कामगिरी मागील तीन वर्षामधील असणे आवश्यक आहे. पुरस्कारासाठी आवश्यक असणारी कामगिरी म्हणजेच साहसी उपक्रम जमीन, हवा किंवा पाणी या ठिकाणी केलेले असणे आवश्यक आहे. पुरस्कारासाठी आवश्यक असणारी कामगिरी म्हणजेच साहसी उपक्रम अत्युकृष्ट असणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील सर्व साहसी उपक्रम करणाऱ्या खेळाडू, नागरिकांना केंद्र शासनाच्या वरील पोर्टलवर भेट देऊन तेनझिंग नॉर्गे पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत.

            ऑनलाईन अर्जासोबत आवश्यक असणारे क्रीडा विभागाचे शिफारस पत्र प्राप्त करुन देण्यासाठी अर्जदारांनी त्यांचा अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह क्रीडा विभागाच्या desk10.dsys-mh@gov.in या ई-मेल पत्यावर किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे दि. 12 जुलै, 2023 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.

*****

No comments: