12 July, 2023

 

जिल्हास्तरीय शालेय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 12 : सुब्रतो मुखर्जी स्पोर्टस एज्यूकेशन सोसायटी, नवी दिल्ली द्वारा सन 2023-24 या वर्षी आयोजित करण्यात येणारी 62 वी आंतरराष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप (सबज्युनिअर/ज्युनिअर) क्रीडा स्पर्धा दि. 14 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर, 2023 या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित होणार आहेत. या अनुषंगाने  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांना खेळाच्या स्पर्धाचा कार्यक्रम प्राप्त झाला आहे.

येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारा सन 2023-24 या वर्षात जिल्हास्तरीय शालेय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेचे आदर्श महाविद्यालयात दि. 19 ते 20 जुलै, 2023 रोजी आयोजन करण्यात आलेले आहे. जे संघ सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणार आहेत अशा सर्व संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी  www.subrotocup.inhttps://dsohingoli.clicksportsindia.com/auth/login या जिल्हा क्रीडा अधिकारी काया्रलय, हिंगोलीच्या संकेतस्थळावर दि. 17 जुलै, 2023 पर्यंत खेळाडू तसेच संघांची नोंदणी करणे अनिवार्य आहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळांडूसाठी 14 वर्षाखालील मुले (सब ज्युनिअर) यांच्यासाठी दि. 1 जानेवारी, 2010 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. 17 वर्षाखालील मुले व मुली (ज्युनिअर) या वयोगटासाठी दि. 1 जानेवारी, 2007 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असणे आवश्यक आहे.   

हिंगोली जिल्ह्यातील खेळाडू व संघानी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.

*****

No comments: