10 July, 2023

 

माजी सैनिकांनी सोल्जर जीडी व जेसीओ पदाच्या भरतीसाठी

संपर्क साधण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 10 : माजी सैनिकांसाठी सोल्जर जी.डी. व जेसीओ (ट्रेडसमेन व क्लार्क) पदासाठी  दि. 24 जुलै ते 4 ऑगस्ट, 2023 या कालावधीत भरती करण्यात येणार आहे.

हेडक्वार्टर 97, आर्टी ब्रिगेड, औरंगाबाद मिल्ट्री कॅन्ट (सर्वत्रा स्टेडियम) येथे दि. 31 जुलै ते दि. 4 ऑगस्ट, 2023 या कालावधीत जेसीओ-6, सोल्जर जीडी-220, क्लार्क-6, शेफ कम्युनिटी-5, धोबी-2, ड्रेसर-3, हाऊस किपर-3, लोहार-1, मेस किपर-1, मेस शेफ-1 या पदासाठी भरती पक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

यासाठी उमेदवार माजी सैनिक असावा. शेप-1 असावा. चरित्र Exemplary/ Very good असावे. पोलीस केस नसावा. सोल्जर जीडीसाठी वय 50 वर्षे असावे तर जेसीओ पदासाठी 55 वर्षे असले पाहिजे. अधिक माहितीसाठी 9404975099 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.  

*****

No comments: