20 July, 2023

 

राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगीता ताई चव्हाण यांची

सखी वन स्टॉप सेंटर व ट्रेंडस मॉलला भेट

* महिला कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या


 

 

            हिंगोली (जिमाका), दि. 20 : राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगिताताई चव्हाण हे आज हिंगोली दौऱ्यावर असताना जिल्ह्यातील महिलांचे प्रलंबित प्रकरणावर चर्चा केली. तसेच येथील सखी वनस्टॉप सेंटरच्या कार्यालयात जाऊन पाहणी केली व प्रकरणांचा आढावा घेत अडीअडचणीवर मार्गदर्शन केले. तसेच येथील एनटीसी भागातील ट्रेंडस मॉल मध्ये जाऊन महिला कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या.

            यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर.आर. मगर, सखी वन स्टॉप सेंटरचे समुपदेशक दिनेश पाटील उपस्थित होते.  

*******

No comments: