19 October, 2026

औद्योगिक वापरासाठी वाहतूक करण्यात येणारे सोयाबीनचे कुटार जप्त

हिंगोली दि. १९ ऑक्टोबर : शासनाच्या आदेशानुसार, पशुखाद्य व चारा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आज १९ ऑक्टोबर २०२६ रोजी वसमत–मालेगाव रोडवर औद्योगिक वापरासाठी वाहतूक करण्यात येत असलेल्या सोयाबीनच्या कुटाराच्या दोन पिकअप वाहनांवर कारवाई करण्यात आली. तहसीलदार सारंग चव्हाण, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. अजय मुस्तरे आणि तालुका कृषी अधिकारी सुनील भिसे यांच्या संयुक्त समितीने सदर दोन्ही पिकअप वाहनांमधून औद्योगिक वापरासाठी नेण्यात येत असलेले सोयाबीनचे कुटार जप्त केले.

पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करणे आणि चाऱ्याचा योग्य वापर होणे या दृष्टीने सदर कारवाई करण्यात आली. चारा उपलब्धतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पशुखाद्य घटकांचा वापर व वाहतूक शासनाच्या लागू आदेशांनुसार होणे आवश्यक आहे. सदर कारवाई तहसीलदार, वसमत यांच्या नेतृत्वाखाली संबंधित विभागांच्या संयुक्त समितीमार्फत करण्यात आली.
00000

No comments: