19 October, 2026

प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढा; ई-फाईल्स प्रणालीवर भर द्या!​मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचे निर्देश

​हिंगोली दि.१९ ऑक्टो (जिमाका): हिंगोली जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने बैठक पार पडली. जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीत विविध विभागांच्या प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रशासकीय कामे विहित वेळेत पूर्ण करून प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिले.

​ई-ऑफिस आणि ई-फाईल्सच्या वापरावर विशेष भर

​कागदविरहित आणि वेगवान कारभारासाठी 'ई-ऑफिस' प्रणाली प्रभावीपणे राबवण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने:
​ई-फाईल्स क्रिएटिव्ह आणि ई-फाईल्स रिसिप्ट क्रिएटिव्ह या प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
​शासकीय कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फाईल्सचा निपटारा जलद गतीने कसा करता येईल, यावर चर्चा झाली.
​
​नागरिकांच्या तक्रारी आणि शासकीय पातळीवरील प्रकरणांचे वेळेत निवारण व्हावे, असे निर्देश देण्यात आले:
​आपले सरकार पोर्टल वर नागरिकांकडून आलेल्या अर्जांचा आणि तक्रारींचा विहित वेळेत निपटारा करणे. ​मा. लोकायुक्त प्रकरणे प्रलंबित चौकशी 
​पीजी पोर्टल, ​न्यायालयीन प्रकरणे यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला 
​
​या बैठकीस
​डॉ. सुधीर ठोंबरे (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी)
​नामदेव केंद्रे (प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा)
​दिगंबर माडे (मुख्य लेखा व वित्त अधिकारी),
​केशव गडापोड (उपमुख्य कार्यकारी अधिकारी - पंचायत)
​विजय बोराटे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी - महिला व बालविकास),
​अतुल वायसे (जिल्हा कृषी अधिकारी), मंजुश्री कलेवाड (शिक्षणाधिकारी-प्राथमिक), 
​राजू नरवाडे (कार्यकारी अभियंता) यांच्यासह 
 तालुक्यांचे सर्व गट विकास अधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते
00000

No comments: